मळगावचे प्रथम सरपंच सूर्याजी खानोलकर यांच्या तैलचित्राचे अनावरण !

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 25, 2023 21:11 PM
views 154  views

सावंतवाडी : मळगाव ग्रामपंचायतची स्थापना १९५७ साली झाली. त्यावेळी प्रथम सरपंच पदाचा मान लाभलेले कै. सूर्याजी सखाराम खानोलकर यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांचे नातू व सामाजिक कार्यकर्ते महेश खानोलकर यांच्याहस्ते, मळगाव सरपंच स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर मळगाव गावच्या नूतन ग्रामसचिवालयात हे तैलचित्र सन्मानपूर्वक लावण्यात आले.

यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, माजी सरपंच विजयानंद नाईक, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, लाडू जाधव, सदस्या निकिता राऊळ, निकिता बुगडे, माजी सदस्य गुरुनाथ गावकर, माजी उपसरपंच काळोजी राऊळ, सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सावंत, मनोहर राऊळ, सुभाष नाटेकर, चंद्रकांत जाधव, सुखदेव राऊळ यांसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महेश खानोलकर यांच्यासह गुरुनाथ गांवकर, चंद्रकांत जाधव, आनंद देवळी यांनीकै. सुर्याजी खानोलकर यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करीत आपले विचार मांडले. कै. सूर्याजी खानोलकर तसेच माजी सरपंच कै. रमाकांत खानोलकर यांचे मळगांव गावच्या विकासात असलेले योगदान यावेळी सर्वच वक्त्यांनी विषद केले. स्वागत सरपंच स्नेहल जामदार तर आभार उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी मानले.