लायन्स क्लब सावंतवाडीच्या स्वागत फलकांचे अनावरण !

Edited by: विनायक गावस
Published on: August 03, 2023 11:50 AM
views 177  views

सावंतवाडी : लायन्स क्लब तर्फे सावंतवाडी शहर तसेच इतर महत्त्वाच्या रस्त्यांवर स्वागत फलक लावले आहेत. या फलकांचे अनावरण प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चीखले, ला.गजानन नाईक, अँड. परिमल नाईक, रवी स्वार, रविकात सावंत, संतोष चोडणकर, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते झाले.

या अनावरण प्रसंगी सावंतवाडी लायन्स क्लबचे अध्यक्ष अमेय पई, सचिव अभिजित पणदुरकर, खजिनदार सुनील दळवी, अशोक देसाई, महेश पाटील, प्रकाश राऊळ, सदाशिव नार्वेकर व इतर सदस्य उपस्थित होते.

हे फलक बांदा नाका, शिरोडा नाका, कोलगाव तिठा, बोर्डीचा पुल नाका, झाराप झिरो पॉइंट, खामदेव नाका येथे बसविण्यात आले आहेत.