ग्रामपंचायत लोरे नं 1 येथे शिलालेखाचं अनावरण

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 14, 2023 19:26 PM
views 83  views

कणकवली : माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत लोरे नं १ येथे शिलालेखाच अनावरण करण्यात आलं. शिलालेखाचे पूजन मनोज रावराणे (माजी सभापती कणकवली )गावचे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. 


सकाळी ८.३० वाजता स्वच्छ स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मार्फत ग्रामपंचायतिने स्वच्छ परिसर स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले लोरे नं १ गावचे रहिवासी श्री.अजित ढवण गांधीवाडी यांना ग्रामपंचायतिचे ध्वजवंदन करण्याचा मान देण्यात आला . तसेच ९.००वाजता हातात मातेचे दिवे लावून पंचप्राण शपथ घेऊन दोन मूठ माती  कलशामध्ये घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर माजी निवृत्त पोलीस दल ,आर्मी यांचा  शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सकाळी ९.०० वाजता सार्वजनिक ठिकाण गावामध्ये येथे वृक्ष लागवड करण्यात आले.

 त्यावेळी उपस्थित सरपंच ग्रामपंचायत लोरे नं.१श्री.अजय रावराणे,श्री.मनोज रावराणे(माजी सभापती कणकवली ),उपसरपंच सुमन गुरव ग्रामसेवक -ऋतुराज कदम सदस्य नरेश गुरव, सतीश कासले, सुप्रिया रावराणे सोनाक्षी खाड्ये ,समीक्षा मोसमकर, सुनील रावराणे ,  ग्रामस्थ -अलंकार रावराणे ,मारुती राणे, अनंत राणे  तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आरोग्य कर्मचारी, आदी उपस्थित होते.