
कणकवली : कणकवली तहसिलदार कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसाय ओळखून आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने कार्यालयात दिशादर्शक फलक लावण्यात आला. या फलकाचे अनावरण कणकवली तालुका पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
अशोक करंबेळकर म्हणाले, कणकवली तहसिलदार कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिलांसह सर्वसामान्यांना कार्यालयातील कोणत्याही शाखेकडे जावयाचे असेल तर हा मार्गदर्शक फलक उपयुक्त ठरणार आहे. तहसिलदार कार्यालयाचे काम पारदर्शक व गतीमान पद्धतीने होत असताना अशा फलकांमुळे नागरीकांसाठी ते अजून फायदेशीर ठरू शकते.
दीक्षांत देशपांडे म्हणाले, तहसिलदार कार्यालयातील या मार्गदर्शक फलकासोबत आम्ही चौकशी कक्ष सुद्धा सुरू केला आहे. या ठिकाणी सेवा देण्यासाठी कर्मचारी व शिपाई असणार आहे. या ठिकाणहूनही नागरीकांना अधिकचे मार्गदर्शन मिळेल. तहसिलदार कार्यालयाचे कामकाज शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पारदर्शक, लोकाभिमुख व गतीमान करण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसिलदार दिक्षांत देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष दादा कुडतरकर, ग्राहक पंचायतीच्या तालुकाध्यक्षा सौ. श्रद्धा कदम, डॉ. सुहास पावसकर, सुनिल वळवी, भालचंद्र मराठे, मंडळ अधिकारी संतोष नागांवकर, दिलीप पाटील खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.