
दोडामार्ग : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साटेली-भेडशी येथे भव्य-दिव्य स्मारक अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य रक्षक मावळा ग्रुप साटेली-भेडशी पंचक्रोशी व तमाम शिवप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रामपंचायत पटांगणावर हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वराज्य रक्षक मावळा ग्रुप साटेली -भेडशी पंचक्रोशी यांनी केले आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने “जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे”च्या घोषणांनी साटेली-भेडशी दुमदुमणार असून, हा सोहळा शिवभक्तांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील हे पहिलं भव्य -दिव्य असं स्मारक असणार असून आयोजकांनी सर्व शिवप्रेमींनी यांना या स्मारक अनावरण सोहळ्यास व शिवजयंती उत्सवात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
🚩 सकाळी ९ वाजता किल्ले पारगड वरून शिवज्योत साटेली-भेडशी येथे आगमन.
🚩 सकाळी १० वाजता ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण.
🚩 १०.३० वाजता विधिवत पूजा व अभिषेक.
🚩 ११ वाजता इतिहासकार डॉ. पी. डी. पाटील यांचे व्याख्यान.
🚩 दुपारी १२ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम.
🚩 दुपारी १.३० पासून महाप्रसाद.
🚩 दुपारी ३ वाजता भगव्या झेंड्यांनी सजलेली बाईक, कार व अन्य वाहनांची भव्य रॅली.
🚩 रात्री ९ वाजता “आग्र्याहून दख्खन” हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग.
सोहळ्यातील प्रत्येक क्षण ड्रोनच्या माध्यमातून चित्रित करण्यात येणार असून, संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.











