
दोडामार्ग : आर्थिक वर्षाचा बागुलबुवा करून शेतकऱ्यांचे वीज पुरवठा खंडीत करण्याच काम विजवितरण कडून करण्यात येत आहे. सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. मुलांना अभ्यास करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विजवितरण कंपनीने परीक्षा कालावधीत जिह्यातील वीज पुरवठा खंडीत करून नये अन्यथा गोरगरीब जनतेला आपल्या दारात बसवू असा इशारा ठाकरे सेनेचे जिह्वाध्यक्ष बाबूराव धुरी यांनी निवेदना द्वारे अधीक्षक अभियंता यांना दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, आर्थिक वर्ष सुरु आहे. हे आम्हाला ही माहित आहे. मात्र याचा फायदा घेत वीज वितरण कडून एखाद्या ग्राहकाचे एक तरी बिल थकीत राहिले तरी त्या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. त्यातच विद्युत पुरवठा खंडीत केला तर मुलांना अभ्यास करताना मोठा त्रास होत आहे याचा परिणाम मुले दहावी बारावी परीक्षेत नापास हाऊ शकतात. त्यामुळे अशा कठीण काळा मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत करू नये. वेळोवेळी आम्ही व आमच्या जनतेने तुम्हाला प्रत्येक विषयात सहकार्य केले आहे. त्यामुळे आपल्या कंपनी कडून आम्हला सहकार्य करावें अन्यथा सर्व गोरगरीब जनता आपल्या दारात बसवू असा इशारा बाबुराव धुरी यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरणला दिला आहे.










