शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे दुचाकी रॅली

रॅलीचे यंदा ९वे वर्ष
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 16, 2026 11:12 AM
views 40  views

शिवभक्तांनी सहभागी व्हावे : युवा नेते प्रताप भोसले यांचे आवाहन

कणकवली : शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे प्रती वर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन १९ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. रॅलीचे हे ९वे वर्ष आहे.

रॅलीचा प्रारंभ वरवडे येथून होणार आहे. तेथून रॅली कुंभारवाडीमार्गे कलमठ बाजारपेठेत दाखल होईल. त्यानंतर रॅली कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात येईल. तेथून बाजारपेठमार्गे कणकवली - कनेडी मार्गावर व तेथून नरडवे चौकातून छ. शिवाजी महाराज चौकात दाखल होईल. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप होणार आहे.

यावेळी रॅलीच्या मार्गातील ठिकठिकाणी असलेल्या शिवजयंती उत्सवांनाही भेटी देण्यात येणार आहेत. दरम्यान शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे दिवसभरात व त्यानंतरही विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. रॅलीमध्ये शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक, युवा नेते प्रताप भोसले यांनी केले आहे.