पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी घेतलं कुणकेश्वरचं दर्शन

दर्शनासाठी अलोट गर्दी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 15, 2026 19:46 PM
views 40  views

देवगड : ओम नम: शिवाय च्या नामजपात व श्री देव कुणकेश्वरचा नामघोषात कुणकेश्वर महाशिवरात्रौ त्सवामध्ये कुणकेश्वर तीर्थस्थानी पहिल्याच दिवशी भाविकांचा जनसागर लोटला. पहिल्या दिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवास मंगळवारी मध्यरात्री उत्साहात प्रारंभ झाला.रात्री १२ वाजले नंतर देवस्थानचे पुजारी ,मानकरी यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची पूजा झाल्यावर प्रथम शासकीयपूजा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ,माजी पालकमंत्री दीपक केसरकर,यांच्या हस्ते संपन्न झाली.

त्याच बरोबर पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री कुणकेश्वर मंदिर येथे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली.दर्शनानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधताना ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, “कुणकेश्वर हा केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. या भागाच्या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा जास्तीत जास्त निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध असून ती जबाबदारी निश्चितपणे मी पूर्ण करणार आहे असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, यात्राकाळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना आणि सुरक्षाव्यवस्था यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.दरवर्षी कुणकेश्वर यात्रेला यशस्वी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते, असे नमूद करत त्यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. यावर्षी प्रशासनाने राबवलेल्या ‘प्लास्टिक मुक्त यात्रा’ या उपक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले. भाविकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.यावेळी स्थानिक पदाधिकारी, देवस्थान समितीचे सदस्य, अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुणकेश्वर मध्ये महाशिवरात्री यात्रोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी तीन दिवसांची यात्रा असल्याने सकाळपासुनच दर्शनासाठी अलोट गर्दी होती.यात्रेत  विक्रमी देवस्वाèया कुणकेश्वर भेटीसाठी आल्या रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारचीमिठाई,हॉटेल्स,मालवणी खाजा,कापड दुकाने,चायना खेळणी यांनी यात्रा परिसर फुलुन गेला होता.या वेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेतीअवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली होती. कुणकेश्वरच्या समुद्रकिनारीही भेल,आईस्क्रिम,इतर हॉटेल्स यामुळे समुद्रकिनारा दुकानाने भरून गेलेला दिसून येत होता.चायना वस्तू ते हस्तकला, धार्मिक व सामाजिक संस्थांची माहिती देणारी केंद्रे यातून यात्रा सजली होतीे.यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, देवगड तहसिलदार आर.जे.पवार यांनी पहाटे दर्शन घेतले.पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.दिवसभरात अनेक मान्यवर मंडळी तसेच राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दर्शन घेतले.

देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्यावतीने लोकप्रतिनिधी,महनीय व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष एकनाथ तेली, सरपंच महेश ताम्हणकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गृहपयोगी वस्तु, कqलगड बाजार यांनी संपुर्ण कुणकेश्वर सजले होते.मंदीर परिसर व यात्रेमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व सेवा मंडळ यांनी खास रांगांची व्यवस्था करण्यात आली होती.देवगड पंचायत समीतीमार्फत विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंदीरासमोर विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता.आपत्ती व्यवस्थापन व तहसिलदार नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला होता.तालुका विधी सेवा समितीमार्फत जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आला होता.

सागरी सुरक्षेच्या दृष्टिने लाइफ जॅकेट धारक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,कर्मचारी सतर्कतेने काम करत होते.तसेच ग्रामस्थांचे भरारी पथक देखील समुद्रस्नान करणाèया भाविकांवर लक्ष देऊन आहेत.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील सतर्क आहे.वाहतुकीची कोणताही प्रकारची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करीत होते.यात्रेतील अनुचित प्रकारावर नजर ठेवण्यासाठी पोलीसांचे टेहळणी पथक देखील सतर्क आहे.एस्टी प्रशासनामार्फत भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक मार्गावर एस्टी गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

पोलिस बंदोबस्त व वाहतुक व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.दुचाकी व तिनचाकी,चारचाकी गाड्यांसाठी स्वतंत्र पार्कींगव्यवस्था दरवर्षीप्रमाणे ठेवण्यात आली होती.सायंकाळपासून समुद्रकिनाऱ्यावर भाविकांच्या गर्दीचा उच्चांक दिसून येत होता. समुद्रकिनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महिला पोलीस तसेच पोलीस अधिकारी तैनात ठेवण्यात आले होते.त्याचप्रमाणे कुणकेश्वर देवस्थान ट्ड्ढस्टचे प्रत्येक स्वयंसेवक देखील कार्यरत होते.यात्रा यशस्वी होण्यासाठी  ग्रामपंचायत कुणकेश्वर व देवस्थान ट्रस्ट कडून व कुणकेश्वर ग्रामस्थ यांच्या कडून यात्रेचे चांगले नियोजन कराण्यात आले होते. दर्श अमावास्येची पर्वणी असून यादिवशी पवित्र तिर्थस्नानाने यात्रेची सांगता होणार आहे.