
सावंतवाडी : अवकाळी पावसाने मळगाव घाटातील माती रस्त्यावर येऊन एका वृद्धाचा अपघात झाला. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
मॉन्सी पी मॅथ्यू (वय६०,रा सावंतवाडी) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. अवकाळी पावसाने मळगाव घाटातील माती रस्त्यावर आल्याने त्यांच्या अपघात झाला. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. यातच त्यांची प्रकृती ढासळली. डॉक्टरांकडून सीपीआर देण्यात आला. मात्र, त्यांनी उपचारांना साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले.