
सिंधुदुर्ग : दशावतार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनेते गौरव शिर्के यांची “राष्ट्रीय गौरव रत्न सन्मान २०२६” या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा सन्मान सोहळा लखनऊ येथे पार पडणार आहे.
MSME च्या माध्यमातून दशावतार नाट्यप्रकारात उत्कृष्ट राजपात्र साकारत असलेल्या गौरव शिर्के यांनी सध्या बहुचर्चित “दख्खन चा राजा जोतीबा माझा” या ट्रिकसीन नाटकात प्रभावी अभिनय सादर केला आहे. या नाटकात त्यांनी जोतीबाच्या पाच आक्रमक भूमिकांचे दमदार सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सध्या जय हनुमान दशावतार मंडळाशी संलग्न असलेले शिर्के यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर नाटकाला वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











