
कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचे यजमानपद कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांना मिळाले आहे. आज सकाळी संत राऊळ महाराज महाविद्यलायच्या इनडोअर बॅडमिंटन कोर्टवर या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्या १ ऑक्टोबरला या स्पर्धेची सांगता होणार असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधून मुंबई विद्यापीठाच्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी यातून संघ निवडला जाणार आहे. कोकण विभागातून या स्पर्धेत १६६ स्पर्धक सहभागी झाले आहेत.
कोकण विभागातील युवक क्रीडापटूंना संधी आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय (विभाग ४) आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असून संत राऊळ महाराज महाविद्यायाला या स्पर्धचे यजमानपद मिळाले आहे. महाविद्यलयाच्या बॅडमिंटन कोर्टवर या स्पर्धेचा शुभारंभ कमशिप्र मंडळाचे पदाधिकारी अनंत वैद्य यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी कामशिप्र मंडळाचे सुरेश चव्हाण, प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष ऍड. निलांगी रांगणेकर, कोकण विभाग क्रीडा समिती सचिव प्रा. चंद्रकांत नाईक, उपसचिव लांजा कॉलेजचे शशांक उपशेट्ये, सदस्य प्रा. राम कदम, प्रा. जयसिंग नाईक, महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रकाश मसुरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनंत वैद्य यांनी या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कमशिप्र मंडळाने यूजीसीच्या सहकार्याने १ कोटी २५ लाख रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे बॅडमिंटन कोर्ट उभारले आहे. संपूर्ण कोकण पट्ट्यात अशाप्रकारचे कोर्ट नाही. अशा लाकडी कोर्टवर खेळायचे खेळाडूंचे स्वप्न असते, त्यामुळे येथील स्पर्धा खूप चांगली होईल असे सांगून त्यानी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी देखील खेळाडूंना शुभेच्छा देऊन मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. कोकण विभाग क्रीडा समितीचे उपसचिव शशांक उपशेट्ये यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून या स्पर्धेत तीन जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांपैकी १३ महाविद्यलयातून साठ मुली आणि २० महाविद्यालयातून १०६ मुलगे असे एकूण १६६ स्पर्धक सहभागी झाल्याचे सांगितले. संत राऊळ महाराज महाविद्यलयाच्या माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष ऍड निलांगी रांगणेकर यांनी देखील आपल्या मनोगतातून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर असे दोन दिवस हि स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेतून मुंबई विद्यापीठ अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेसाठी मुलगे आणि मुलींचे संघ निवडले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी ऑफिशियल्स म्हणून जयेश धुरी. प्रथमेश राणे, प्रद्युम जाधव, तब्बसूम शेख, आदित्य ठाकूर, हे काम पाहत आहेत. यावेळी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, क्रीडा विभाग समिती सदस्य प्रा. डॉ. पी. बी. मसुरकर (समन्वयक, क्रीडा विभाग), सदस्य प्रा. श्री. सदाशिव प्रभू, प्रा.एस. आर. चौगुले, प्रा. सौ. जी. एस. ठाकूर, प्रा. पी. व्ही. सावंत, प्रा. काजल मातोंडकर, प्रा. आर. के. सावंत, प्रा. राज चव्हाण, प्रा. ए. एम. कानशिडे, प्रा. डॉ. आर. जी. गावडे तसेच क्रीडा प्रशिक्षक क्रिस्टन रॉड्रिग्ज, प्रा. रवींद्र ठाकूर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. अजित कानशिडे यांनी केले.










