चौके माडखोलवाडी शाळेत अनोखा महिलादिन

Edited by: विनायक गांवस
Published on: March 07, 2026 21:23 PM
views 21  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके माडखोलवाडी शाळेत 8 मार्च जागतिक महिला दिन शाळेच्या व शिवप्रेरणा विविध सेवा ट्रस्च्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. 

सकाळी मुलांच्या सुंदर स्वागत गीताने कार्यक्रम सुरुवात झाला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अक्षता गावडे व पं स सदस्या मानसी भोगावकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमचे दीपप्रज्वलन करून उदघाटन झाले. यावेळी कर्तृत्ववान महिलाचा सन्मान करण्यात आला. यामध्ये नूतन जि. प सदस्य. अक्षता गावडे, पं स सदस्य सौ मानसी भोगावकर, आरोग्य सेविका सौ नेत्रा पोयेकर, ग्रा. पं सदस्यां सौ.अक्षता गायकवाड, शालेय स्वयंपाकीं सौ मोहिनी गायकवाड, सौ आशा स्वयंसेविका सौ सिद्धली गावंडे, अंगणवाडी मदतनीस सौ सिद्धी पार्टे, जेष्ठ महिला सौ. चव्हाण, यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध महिलांच्या वेशभूषा स्पर्धा संपन्न झाल्या.त्यानंतर आरोग्य सेविका सौ पोयेकर यांनी आरोग्यविषयी छान मार्गदर्शन केले.यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महिलांचे विविध खेळ घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. दुपारच्या सत्रात सर्वाना शाळेच्या व शिवप्रेरणा विविध सेवा ट्रस्टच्या वतीने स्नेहभोजन  देण्यात आले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम सांगता करण्यात आली.

सर्वांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन कार्यक्रम छान पार पडला. या कार्यक्रमाचे पालक ग्रामस्थ यांच्या कडून कौतुक होतं आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक दिपक गोसावी व उपक्रशील शिक्षक सुषण ढवण, शिवप्रेरणा विविध सेवा ट्रस्ट ट्रस्ट चौके मांडखोलवाडी अध्यक्ष श्री मयूर गावडे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सत्यवान गावडे, संपूर्ण शालेय व्यवस्थापन समिती आजी माजी विद्यार्थी, महिला पालक ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.