मुंबई - गोवा महामार्गावर कुडाळात भीषण अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 07, 2026 21:43 PM
views 123  views

कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुकेअर हॉस्पिटलच्या समोर भीषण अपघात असून या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीस्वार कुडाळहून आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन  सावंतवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी महामार्गालगत उभ्या असलेल्या इनोव्हा गाडीला दुचाकीची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.