डंपरवरील ताबा सुटून थेट रस्त्याच्या कडेला कलंडला

Edited by: विनायक गांवस
Published on: March 07, 2026 21:36 PM
views 71  views

सावंतवाडी : मळेवाडवरून आरोंद्याच्या दिशेने मायनिंग वाहतूक करणारा डंपर व आरोंद्यावरून मळेवाडच्या दिशेने जाणारा ट्रक आरोंदा खरी जवळील गुळदुवे येथील उतारावर येताच ट्रकच्या मागील बाजूला लागून मायनिंग वाहतूक करणारा डंपरवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटून थेट रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडला.

मात्र, सुदैवाने हा डंपर येथील झाडाला अडकल्याने रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या खोल दरीत जाता जाता वाचला.अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.मात्र डंपरचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.  येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेली झाडी, अरुंद रस्ते यामुळे वाहन चालवताना सुद्धा मोठी कसरत करावी लागत आहे.