वेंगुर्ला पोलिसांचा अनोखा उपक्रम

नाकाबंदी दरम्यान मध्यरात्री पर्यटकांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Edited by:
Published on: January 01, 2025 11:39 AM
views 325  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यात मानसिश्वर येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आल्या. मध्यरात्री नवीन वर्ष २०२५ चे स्वागत पर्यटकांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. यामध्ये पोलीस हवालदार भगवान चव्हाण, वाहतूक अंमलदार मनोज परुळेकर होमगार्ड तुषार मांजरेकर, प्रवीण गिरप, पोलीस हवालदार सुरेश पाटील आदींनी सहभाग घेतला.