
सावंतवाडी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्यावतीने सलग अठरा वर्षे विविध उपक्रम राबविले जात असून संस्थेच कार्य कौतुकास्पद आहे असं मत केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. ज्ञानदीपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुरस्कार सोहळ्याच निमंत्रण दिले. ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त सावंतवाडी येथे उपस्थित राहणार आहे.
सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण हे अभिमानास्पद आहे असे मंत्री श्री नाईक म्हणाले. यावेळी संस्थापक वाय पी नाईक, अध्यक्ष जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते राजन मडवळ आदी उपस्थित होते.