
सिंधुदुर्ग : आर.पी.आय. चे राष्टीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांचे कोकण दौऱ्यावर आगमन होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील - खेड येथील हॉटल बिसू मध्ये पक्षाचा कोंकण स्तरीय भव्य मेळावा दिनांक २४ ऑगस्ट २०२४ ला आयोजित केला असून, या मेळाव्यात मा. आठवले साहेब यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी नुकतीच सिंधुदुर्ग आर.पी. आय. ची जिल्हा कार्यकारिणीची बैठक सावंतवाडी येथील हॉटेल मँगो मध्ये संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कदम होते तर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सह सचिव रमाकांत जाधव यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली. या बैठकीस कोकण सह सचिव शंकर जाधव ( उसपकर), जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, कार्याध्यक्ष सखाराम कदम, खजीनदार आनंद पेंडुरकर, दोडामार्ग नगर पंचायतीच्या नगरसेविका ज्योती रमाकांत जाधव, महिला कार्यकर्त्या नीलिमा कांबळे तसेच सावंतवाडी तालुकाध्यक्ष संतोष जाधव, दोडामार्ग तालुका अध्यक्ष रामदास कांबळे, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विलास राठये, कणकवली तालुका अध्यक्ष एस.के. तांबे, सावंतवाडी तालुका सचिव पंकज जाधव, उपाध्यक्ष अमोल जाधव व जयराम जाधव, तसेच दोडामार्ग तालुका सचिव सचिव दीपक पावसकर, कार्याध्यक्ष प्रेमानंद पालयेकर, तालुका उपाध्यक्ष मनोहर जाधव, सत्यवान पालयेकर, सहसचिव नकुळ कांबळे, आंयी माजी उपसरपंच लाडू जाधव, सुधा पालकर, इतर पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीस मेळाव्याची जोरदार तयारी करण्याचे ठरवण्यात आले. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते खेड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खेड येथे होणारा मेळावा पक्षाचे कोंकण अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या मेळाव्यास कोंकण, राज्य व केंद्रीय कार्यकारिणीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक तालुक्यात गावागावात पक्षाचेकार्यकर्ते पोहचणार आहे व जनजागृती करणार आहे, असे बैठकीत नियोजन करण्यात आले आहे.