दुर्दैवी | निलम भालेकरनं वयाच्या २५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Edited by: विनायक गावस
Published on: February 26, 2024 13:36 PM
views 4802  views

सावंतवाडी : येथील कुमारी निलम प्रदिप भालेकर (२५) हिचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तीची हल्लीच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. ती महिला उद्योग केंद्र, वैश्यवाडा, सावंतवाडी येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तिच्या पश्चात आई-वडील, बहीण - भाऊ, काका - काकी असा परिवार आहे. सावंतवाडी, गवळीतीठा येथील चंद्रकांत वॉशिंग कंपनीचे मालक प्रदिप चंद्राकांत भालेकर यांची ती मुलगी व परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर व मा. नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर व भालेकर खानावळचे मालक राजू भालेकर यांची ती पुतणी होती.