दुर्दैवी | नौदल दिन बंदोबस्तास असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाचा मृत्यू

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 05, 2023 10:23 AM
views 1072  views

मालवण : नौदल दिनाच्या बंदोबस्तास असलेल्या विष्णू सिद्धराम भोळे (वय- ५५) रा. इचलकरंजी या गृहरक्षक दलाच्या जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

नौदल दिनाच्या बंदोबस्तासाठी भोळे हे तारकर्ली येथे सेवा बजावत असताना सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. रुग्णालयात त्यांना दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. येथील शवविच्छेदन करून मृतदेह रवाना करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.