दुर्दैवी | विद्युत वाहिनी अंगावर पडून महिलेचा मृत्यू

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 23, 2024 05:19 AM
views 412  views

मालवण : विद्युत वाहिनी अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना मालवण तालुक्यातील काळसे बाग वाडी मध्ये आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिता अंकुश कुडाळकर (वय 65) असे या महिलेचे नाव आहे. गावातील विज वाहिन्या जीर्ण झाल्याने त्या बदलण्याची मागणी सातत्याने ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा फटका या महिलेला बसला. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.