
कुडाळ : सायकलिस्ट्स असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे *इन्स्पायर सिंधुदुर्ग* या सायकल स्पर्धेचे आठवे संस्करण रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी बॅ. नाथ पै मैदान, एमआयडीसी, कुडाळ येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा २५ किमी फन राईड व ६० किमी एलिट रेस अशी दोन प्रमुख विभागात होणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अमोल शिंदे, रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, डाॅ बापू परब, प्रथमेश सावंत, आदी पदाधिकारी-सदस्य उपस्थित होते. सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन रेनबो रायडर्स हे आयोजक आहेत.
सिंधुदुर्ग सायकल रेस हा कुडाळ येथे २५ जानेवारी २०२६ रोजी होणारा, जिल्ह्यातील सायकलपटूंना प्रेरणा देणारा प्रतिष्ठित उपक्रम पुन्हा येत आहे.या स्पर्धेत बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांसाठी राहण्याची तसेच फन राईड करणाऱ्या मुलांसाठी विशेष सेफ्टीची व्यवस्था करण्यात आली आहे.
भरघोस आकर्षक बक्षिसे
60 किमी एलिट रेससाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत . सर्वसाधारण विजेता रू 25,000 बक्षिस तर पुरुष गटात १४ ते ४० वर्षे ओपन तसेच ४० वर्षांवरील मास्टर्स, तर महिला गटासाठी ओपन अशी एलिट रेसची विभागणी करण्यात आली आहे.या प्रत्येक गटात प्रथम क्रमांक रू 15000 व ट्राॅफी, द्वितीय क्रमांक रू 10,000 व ट्राॅफी, तृतीय क्रमांक रू 7000 व ट्राॅफी देण्यात येणार आहे.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व मेडल देण्यात येणार आहे.
२५ किमी फन राईडची नोंदणी फी ४०० रुपये तर ६० किमी एलिट रेसची नोंदणी फी १६०० रुपये निश्चित करण्यात आली आहे सर्व स्पर्धकांसाठी हेल्मेट बंधनकारक असून मार्गावर स्वयंसेवकांच्या मदतीने मुलांसह सर्व सायकलपटूंच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्याबाहेरून व राज्याबाहेरून येणाऱ्या सायकलपटूंसाठी कुडाळ शहरात राहण्याची व आवश्यक त्या सोयींची व्यवस्था आयोजकांकडून केली जाणार आहे.
स्वच्छ आणि हरित सिंधुदुर्गचा संदेश देत, पर्यावरणपूरक व सुरक्षित सायकलिंगची चळवळ अधिक बळकट करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.हा उपक्रम सायकलिस्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग या नोंदणीकृत संस्थेतर्फे, स्थानिक सामाजिक संस्था व वैद्यकीय सेवकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.इच्छुक सायकलपटूंनी पोस्टरवरील क्यूआर कोडच्या माध्यमातून किंवा कुडाळ येथे शिव एंटरप्रायजेस9921959988,इन्स्पायर सायकल 9421261212, परब हाॅस्पिटल सुकळवाड 8208245018,कनिष्क झेरॉक्स ओरोस8788564630,झांटये मेडिकल 9422669306, जनाई मेडिकल कणकवली 9422633721, डाॅ साईनाथ पित्रे सावंतवाडी 9403559577,शिवदत्त सावंत वेंगुर्ला 9420739990,रामचंद्र चव्हाण मालवण9423302720, संकेत नाईक दोडामार्ग 9923119791,एम पी सायकल देवगड8087820760, जयदिप पडवळ शिरोडा 9049933606,संतोष टक्के वैभववाडी 9423300274 नोंदणी करून घ्यावी, अशी आयोजकांकडून विनंती करण्यात येत आहे. उपस्थितीती गजानन कांदळगावकर, रूपेश तेली, अमोल शिंदे, शिवप्रसाद राणे,प्रमोद भोगटे, डाॅ बापू परब, प्रथमेश सावंत, सिध्दाली परब, सचिन मदने आदी उपस्थित होते.










