तीर्लोट ग्रामपंचायतवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 06, 2023 19:32 PM
views 358  views

देवगड : देवगड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या तीर्लोट ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले आहे.सरपंच पदासह सात जागा जिंकत भाजपनेआपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

देवगड तालुक्यात ९ ग्रामपंचायीतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.याची आज तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.यामध्ये सर्वात महत्त्वाची असलेली तीर्लोट ग्रामपंचायत भाजपला मिळवण्यात यश मिळाले आहे.ही निवडणूक भाजपा व शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली होती.मात्र जनतेने भाजप ला साथ देत सरपंच व सहा सदस्य निवडून दिले. तिर्लोट ग्रामपंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व


तिर्लोट येथे

सरपंच- रितिका रामकृष्ण जुवाटकर(८०३ विजयी), 

सदस्य- प्रभाग १ मधून मानवी सुधाकर तिर्लोटकर(१४९विजयी), प्रशांत पांडूरंग अनभवणे(१४७ विजयी)

प्रभाग २, कल्पिता कल्पेश घाडी(२६७विजयी), कल्पेश दाजी घाडी(२८१ विजयी), सुनिल गणपत तिर्लोटकर(२५४ विजयी)

प्रभाग ३ मानवी मनेष बापर्डेकर(२६५ विजयी), प्राची घाडी(३१३ विजयी), राजन घाडी(२६४ विजयी)

 प्रभाग ४ रविंद्र गणपत जुवाटकर(२५९विजयी),आचल अरविंद जुवाटकर(२३२विजयी निकीता राघव(२२८ विजयी), 

 हे निवडून आले आहेत.नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा आमदार नीतेशजी  राणे यांनी अभिनंदन केले.