
सावंतवाडी : आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच समीर गावडे यांनी आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलय. एकूण चार सदस्य निवडून आणून निगुडे गावातील राजकारणातला आपला दबदबा पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलाय. त्यांच्या अन्य जागाही काही मतांनी पडल्याचं सांगत, दुसऱ्या गटातील निवडून आलेले सदस्यही आपल्या सोबत असल्याचा दावा समीर गावडे यांनी केलाय.
मागच्या निवडणुकीत समीर गावडे हे थेट सरपंच म्हणून निवडणुन आले होते. सर्वांना सोबत घेत त्यांनी गावात विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. मनमिळाऊ स्वभाव असल्याने लोकांचंही समीर गावडे यांना नेहमीच सहकार्य मिळत केलं. आत्ताच्या निवडणूकित आपले चार सदस्य निवडणून आणून त्यांनी पक्षात एक वेगळं वलय निर्माण केलंय.