
सावंतवाडी : शहरात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. पावसाळ्यापूर्वी न घेतलेली दक्षता हे त्याच कारण आहे. मात्र, झाड तोडणे हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. तर अंडरग्राऊंड वीज वाहिन्या करणं आवश्यक आहे. तरच विज समस्या व होणारी हानी टळू शकेल असे मत माजी उप नगराध्यक्ष राजन पोकळे यांनी व्यक्त केले.
पोकळे म्हणाले, सावंतवाडी शहरासाठी अंडरग्राऊंड वीज वाहिनीसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, ते पूर्णत्वास आले नाही. यामुळे आजवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आर्थिक नुकसानीसह मनुष्य हानीही होत आहे. महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना न केल्यान अंधारात राहण्याची वेळ आली आहे. झाड तोडणे हा त्यावरचा उपाय नसून महावितरणकडून शहरात अंडरग्राऊंड वीज वाहिन्या करण्यावर भर द्यावा अशी मागणी केली आहे.