
सावंतवाडी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नेमळे गावातील पाटकरवाडी ते फौजदारवाडी, हरिजनवाडी, येरंडवाडी रस्ता या रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. कोट्यवधी रूपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी ८ ते ९ मीटर रूंदीन जागेची आवश्यकता भासणार आहे. याबाबत प्राधनमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उप अभियंतांनी विद्यमान सरपंच विनोद राऊळ या़ंना जमिन मालकांकडून जागा व ग्रामपंचायत ठराव उपलब्ध करून देण्यासाठीच पत्र दिल आहे. विनोद राऊळ सरपंच असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या रस्त्यांसाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हे काम मार्गी लागलं आहे.
परंतु, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विनोद राऊळ यांच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव होऊन ग्रामपंचायतीवरची सत्ता गेली. मात्र, यातून खचून न जाता विनोद राऊळ यांनी जनसेवेसाठी पुन्हा मैदानात उतरत मुलभूत गरजांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रस्ते पोहचले नव्हते अशा ठिकाणी रस्ते पोहचणार आहेत. यातच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका देखील तोंडावर आल्या आहेत. त्यात ग्रामपंचायतीच्या पराभावाचा वचपा काढण्यासाठी विनोद राऊळ जोमान पुढे सरसावले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेत विनोद राऊळ यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.