
वैभववाडी : राज्य सरकारमधील जबाबदार मंत्र्यांकडून महीलांबाबत होत असलेल्या अश्लील टिप्पणीवरून उंबर्डे येथे महीला स्वाधार मंचाच्या वतीने आत्मक्लेष आंदोलन करण्यात येत आहे. उंबर्डे ग्रामपंचायतीच्या समोर आज सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
राज्यात सध्या महीलांबाबत मंत्र्यांकडून अपामानित करणारी विधाने होत आहे. याविरोधात आज उंबर्डेतील महिला आत्मक्लेष करीत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसून महीलांना अपमानित करणा-यांविरोधात एल्गार पुकारला आहे.माजी सभापती माई सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.