उद्धव ठाकरे यांची आमदार डॉ. राजन साळवी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप !

ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवत फडकावला ठाकरे गटाचा झेंडा
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 18, 2022 16:58 PM
views 281  views

राजापूर  : उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवींच्या नेतृत्वाखाली राजापूर,लांजासह रत्नागिरी मध्येही अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने दणदणीत यश मिळवत ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला असून विजयानंतर उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने आपले वर्चस्व सिध्द करीत कोकण हा मुळ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सिध्द केले आहे.