ठाकरे येणार सिंधुदुर्गात ; विरोधकांना काय देणार उत्तर ?

Edited by: भरत केसरकर
Published on: February 03, 2024 11:15 AM
views 296  views

सिंधुदुर्ग : उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चार आणि पाच फेब्रुवारीला तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. कोकणातील या दौऱ्याचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून रविवारी 4 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे करणार आहेत. एवढ्यावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिल्यानंतर दीपक केसरकर यांनाच खुले आव्हान उबाठा सेनेने दिले आहे. तर या दौऱ्यावरून नितेश राणेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात काय बोलणार यावर सिंधुदुर्गच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दीपक केसरकर यांच्या होम पिचवर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी संवाद यात्रा घेत असून ज्या होम पिचवर दीपक केसरकर यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्याच सावंतवाडीतील गांधी चौकात थेट संवाद यात्रा घेत दीपक केसरकर यांच्यावर राजकीय हल्लाबोल  उद्धव ठाकरे करणार आहेत.ते काय बोलतात याकडे सिंधुदुर्ग वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

   सेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. रविवारी 4 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा सावंतवाडी मतदारसंघातून दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्याचा शुभारंभ उद्धव ठाकरे हे सावंतवाडीत दुपारी बारा वाजता जनतेशी थेट संवाद साधून करणार आहेत. त्यामुळे दीपक केसरकर  यांच्या होमपीचवर येणार असल्याने दीपक केसरकर यांनाच विधानसभा निवडणुकी आधी खुले आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे हे थेट सिंधुदुर्ग दाखल होणार असून दीपक केसरकर यांच्या मतदार संघात लोकांशी थेट संवाद साधणार आहेत.यामुळे दीपक केसरकर यांनी ठाकरे यांना आव्हान देत संयमी बोलण्याचा इशारा दिला आहे. न पेक्षा आपणही मुंबईत जाऊन काय बोलू शकतो असे सांगत एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे 

     याला प्रत्युत्तर म्हणून दीपक केसरकर यांच्यावर पलटवार करण्याची संधी उबाठा सेनेने सोडले नाही. दीपक केसरकर यांनी भान ठेवून विधान करावे अन्यथा दीपक केसरकर यांच्यावर आम्ही पण काय  काय बोलू शकतो? असा थेट इशारा दिला आहे. दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरे मुळे गृहराज्यमंत्री पद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांना ते आदराने बोलायचे. मात्र यानंतर त्यानी मिंदे गटाकडे जात लाचारी पत्करून गद्दारी केली. मंत्रिपद मिळाल्यानंतर वीस महिन्यात दीपक केसरकर काही करू शकले नाहीत.  हे जनतेला माहीत असून जनता त्यांचा आता पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा थेट इशारा उबाठा सेनेने दिला आहे.

    तर या दौऱ्यावरून आमदार वैभव नाईक यांनी तर दीपक केसरकर यांना खुला आव्हान दिले आहे. दीपक केसरकर यांनी मुंबई दिल्ली आणि सिंधुदुर्ग मध्ये जाऊन आमची पोलखोल करावीच.दीपक केसरकर यांनी घेतलेले खोके आता जनतेच्या समोर येणार आहेत. या भीतीपोटी दीपक केसरकर अशा प्रकारे वक्तव्य करत आहेत.मात्र दीपक केसरकर यांना जनता माफ करणार नाही. असाही टोला वैभव नाईक यांनी लगावत दीपक केसरकरांना खुले आव्हान दिले आहे..

     दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यांना डिवचले आहे. उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यात यायला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा दौरा म्हणजे त्यांच्यासाठी अपशकुन असल्याचा थेट हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा हा भव्य दिव्य असून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणि उत्साह निर्माण करणार असल्याचा दावा आमदार वैभव नाईक आणि सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे

  दरम्यान सावंतवाडी मतदारसंघातून सुरू होणारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा ही शिवसेना लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीची रणशिंग फुंकणारी नांदी असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यातून उद्धव ठाकरे दीपक केसरकर आणि सत्ताधारी भाजप यांच्यावर काय काय टीका करतात ? हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. तर दीपक केसरकर यांच्या होम पिचवर ठाकरे कसे फटकेबाजी करतात ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे..