उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याने दिवट्या पावट्यांना पोटशूळ : संदीप सरवणकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 03, 2024 10:26 AM
views 448  views

वैभववाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.जिल्ह्यातील दिवट्या व पावट्यांना यांचा पोटशूळ आला आहे अशी टीका ठाकरे शिवसेनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी विरोधकांवर केली आहे.

  उद्धव ठाकरे ४व५फेबु्वारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.याला श्री सरवणकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.ठाकरे यांच्या दौऱ्याची विरोधकांनी धास्ती घेतली आहे.त्यामुळेच त्यांची निरर्थक बडबड सुरु आहे.राज्यात गेल्या दिड दोन वर्षांपासून कायदा सुव्यवस्था राहीली नाही आहे.राज्याचे बिहारीकरण होत आहे. सत्ताधारी सर्व स्तरावर अपयशी ठरत आहेत.त्यामुळे विरोधकांना ईडी, सीबीआय यांचा धाक दाखवून संपविण्याचा घाट घातला आहे.या सर्वाला उद्धव ठाकरे पुरून उरले आहेत.त्यांना रोखण्यासाठी भाजपाने सर्व पर्याय करून बघितले.मात्र ते नमत नसल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत.

    शिवसेना फुटीनंतर पक्ष संपेल असं भाजपाला वाटत होते.मात्र त्यानंतरही ठाकरेंना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.हे पाहूनच शिंदे गटात पळून गेलेले व भाजपा यांची पायाखालची जमीन सरकली.कोकण दौऱ्यावर ठाकरे यांना जनतेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.कोकणी जनता ठाकरे शिवसेनेच्या बाजूने असल्याने विरोधक धास्तावले आहेत.त्यामुळेच ते अशी वक्तव्ये करीत आहेत अशी टीका श्री.सरवणकर यांनी केली.

   उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिले म्हणून विचारणा-या   केसरकर व राणेंनी स्वतः जिल्ह्यांसाठी केले ते आधी सांगावे.ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी मेडिकल कॉलेज मंजूर केले.तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीची चांगली भरपाई दिली होती.कोकणी माणसांच्या हितासाठी योग्य निर्णय त्यांनी घेतले.आताच्या सरकारने असे कोणते काम केले आहे का असा सवाल श्री सरवणकर यांनी केला आहे.तसेच जे टिका करताहेत त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे अशी टीका केली.