
मुंबई : सध्या निवडणुकांची हवा आहे. सभा, भेटीगाठी, भाषण, प्रचार, दौरे असा माहोल पाहायला मिळतोय. एकाच दिवसात उमेदवाराच्या प्रचारार्थ 3 ते 4 सभा घेतल्या जातायत. राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीची तर यात ओढाताण सुरु आहे. मात्र, असं असले तरी नागरिकांना भेटण्याची संधी सोडत नाही. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबले जातात. या दरम्यानचे नेतेमंडळींचे काही फोटो व्हायरल होतायत. नुकताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रेल्वेतून प्रवास केला. यावेळी त्यांच्या समवेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊतही उपस्थित होते. हे प्रवासादरम्यानचे फोटो सोशल मिडीयावर झळकताना दिसतायत.
या नेत्यांनी वसई ते बांद्रा प्रवास असा रेल्वेने प्रवास केलाय. लोकल रेल्वेने त्यांचा हा प्रवास झाला. उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांच्यासोबत ठाकरे गटाचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर, विनायक राउत यांचे चिरंजीव गितेश राऊत हे देखील उपस्थित होते.
वसईत उद्धव ठाकरेंची सभा झाली. याचनिमित्ताने लोकल प्रवासाचा आनंद लुटला. मिलिंद नार्वेकर यांनी हा फोटो आपल्या सोशल मिडीयावर पोस्ट केलाय.