उद्धव ठाकरेंकडे कसलं हिंदूत्व शिल्लक आहे ?

पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडणारी लोक त्यांच्या आजूबाजूला : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 06:14 AM
views 250  views

सावंतवाडी : कॉंग्रेसन काढलेल्या जाहिरनाम्यात सत्ता आल्यास ३७० कलम पुनर्स्थापित करू असं सांगितलय हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का ? तसं नसेल तर हिंदुत्व सोडलं नाही असं कुणाला सांगता ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होताना राहूल गांधींची गळाभेट आदित्य ठाकरे घेतात. मग, तुमच्याकडे कसलं हिंदूत्व शिल्लक आहे ? असा सवाल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. तर कम्युनिस्ट, कॉग्रेसशी हातमिळवणी करण्याच काम ठाकरेंनी केल. बाळासाहेबांनी ज्यांना रोखल अशी पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणारी लोक उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला आहेत असा घणाघात मंत्री दीपक केसरकर यांनी केला.


ते म्हणाले, बाळासाहेबांनी लढा दिला अशा कम्युनिस्ट, कॉग्रेसशी हातमिळवणी करण्याच काम उद्धव ठाकरे यांनी केल. बाळासाहेबांनी ज्यांना रोखल अशी पाकिस्तान जिंकल की फटाके वाजवणारी लोक उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे येणारा काळ त्यांना माफ करणार नाही. एकदिवस पंतप्रधान झालो तर ३७० कलम हटवतो, राममंदिर बांधतो असं बाळासाहेब म्हणाले होते. आज कॉंग्रेसन काढलेल्या जाहिरनाम्यात सत्ता आल्यास ३७० कलम पुनर्स्थापित करू असं सांगितलं आहे. हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का ? नसेल तर हिंदुत्व सोडलं नाही असं कुणाला सांगता ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होताना राहूल गांधींची गळाभेट आदित्य ठाकरे घेतात. मग, तुमच्याकडे कसलं हिंदूत्व शिल्लक आहे ? असा सवाल दीपक केसरकर यांनी केला.

तर बाळासाहेबांच्या विचारांसोबत काम करण्यासाठी मी शिवसेनेत गेलो. राज्यमंत्री म्हणून चांगल काम केलं. शरद पवार यांनी शिवसेना संपवण्याच काम पूर्ण केलं आहे. ट्रीपल तलाक रद्द करणार असं कॉंग्रेस म्हणत आहे. औरंगजेबाची संस्कृती ही मंदीर पाडण्याची होती. ती मंदीर आज आम्ही बांधत आहोत. मुस्लिम धर्म पुर्वीपासून इथं होता. परंतू,सुलतानानं आमची मंदीर पाडली नाहीत. दिल्लीत पूर्वी सुलतान होता, त्यांन मंदीर पाडली नाहीत. मुघलांनी मंदीर पाडली. महाराष्ट्रात येऊन धर्मांतर केलं नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ठार केल‌. या धर्मांध शक्तीला औरंगजेब महणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक'करून अतिरेक्यांचे धाबे दणाणून सोडले. कॉग्रेस आणि ठाकरेंचा जाहीरनामा एकच आहे त्यामुळे त्यांनी हिंदूत्व सोडलं आहे. अन्यथा ३७० कलम पुन्हा आणणार नाही, ट्रीपल तलाक आणणार नाही, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसह बसणार नाही हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावं. मुख्यमंत्री पदाची तडजोड होणार नाही असं अमित शहांनी बाळासाहेबांच्या खोलीत सांगितलेल असताना खोटं बोलून कॉंग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी निमित्त शोधण योग्य नाही. त्यामुळे मी आदराने बोलतो, पुढेही बोलेन. परंतू, केलेल्या चुकांबद्दल महाराष्ट्रासमोर बोलेन तुम्ही काय काय केलंत ते उघड करेन असा इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी दिला.