वेंगुर्ल्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे रुग्णांना ब्लॅंकेट वाटप

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीचे निमित्त....
Edited by: दिपेश परब
Published on: January 24, 2023 11:06 AM
views 344  views

वेंगुर्ला: वेंगुर्ला तालुका उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील रेडी, शिरोडा, वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय, संजिवनी हॉस्पिटल आदी ठिकाणच्या ३८ रुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

   सद्या थंडीचे दिवस असल्याने युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील रुग्णालयात हा उपक्रम करण्यात आला. 

   यावेळी वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, माजी नगरसेवक तूषार सापळे, युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट, युवासेना उपशहर प्रमुख कौशल मुळीक, महिला उपशहर संघटक मंजुषा आरोलकर, संदिप पेडणेकर, दिलिप राणे, आपा साळगावकर, काशिनाथ नार्वेकर, सुधाकर राणे, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, सुनिल सातजी, युवती सेना तालुकाधिकारी वडर, वंदना कांबळी, सायली पोखरणकर, समृध्दी कुडव, संतोष कुडव, नंदिनी धानजी, पांडुरंग नाईक, संदिप गावडे, अशोक नाईक आदी उपस्थित होते.