
वेंगुर्ला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मासिक सभा उद्या शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखा वेंगुर्ला येथे होणार आहे. या मीटिंग मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करून थेट सरपंच पदासाठी ईच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे.
तरी वेंगुर्ला तालुक्यातील, शहरातील सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य व लोकप्रतिनिधी यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.