दाभोली, केळुस, उभादांडा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपसरपंच

तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे केले अभिनंदन
Edited by: दीपेश परब
Published on: December 27, 2022 18:56 PM
views 154  views

वेंगुर्ला : तालुक्यातील दाभोली, केळुस व उभादांडा ग्रामपंचायतवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सरपंच विजयी झाल्यानंतर आता याठिकाणी उपसरपंचपदी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचेच सदस्य विराजमान झाले आहेत. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले. 

केळुस ग्रामपंचायत सरपंचपदी योगेश शेटये विजयी तर उपसरपंच पदी संजीव प्रभू यांची निवड झाली. दाभोली सरपंचपदी उदय गोवेकर विजयी व उपसरपंच पदी फिल्सूअनिता फर्नांडिस यांची निवड झाली. तसेच उभादांडा सरपंचपदी निलेश चमणकर तर आता उपसरपंचपदी कालेस्तीन आल्मेडा यांनी निवड झाली आहे. या सर्वांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, तालुका महिला संघटिका सुकन्या नरसुले, वायंगणी सरपंच सुमन कामत यांनी स्वागत केले. यावेळी युवासेना उपविभाग प्रमुख श्रीधर पंडित यांच्यासाहित ठिकठिकाणी नवनिर्वाचित ग्रा प सदस्य उपस्थित होते.