
सावंतवाडी : दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत व रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित उडान महोत्सवान सावंतवाडीकरांची मन जिंकली. मोती तलाव काठावरील या महोत्सवास स्थानिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ आणि रोटरी इंटरनॅशनल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस हा महोत्सव चालला. विविध कार्यक्रमांच आयोजन यात करण्यात आले होते. यावेळी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल. रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून पारंपरिक संबळ वादन कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम खास आकर्षण ठरला. तर पाककला स्पर्धेत ऐश्वर्या बिरोडकर प्रथम, द्वितीय योगिता पांगम, तृतीय संजना वेंगुर्लेकर, उत्तेजनार्थ पूजा कोरगावकर, वेदांगी जोशी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. कार्यक्रमाच सुत्रसंचालन संजय कात्रे यांनी केलं.
यावेळी रोटरी क्लब अध्यक्षा डॉ. विनया बाड, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अॅड. नीता सावंत कविटकर, माजी नगराध्यक्षा आनारोजीन लोबो,अनघा रामाणे, मिहीर मठकर, राजेश रेडीज,आबा केसरकर, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर, दत्ता सावंत, राजू पनवेलकर, मृणालिनी कशाळीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.