
सावंतवाडी : देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयांमध्ये आजीवन अध्ययन व विस्तार विभाग या विभागाचा 'उडान महोत्सव' 2025 पार पाडला. या महोत्सवाला 23 वर्षे पूर्ण होत आली आहेत. सातत्याने हा महोत्सव घेतला जातो. महोत्सवाचं रौप्य महोत्सवी वर्ष जल्लोषात व मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजर केला जाणार आहे. कोकण विभागात मुंबई विद्यापीठाचा हा महोत्सव सावंतवाडी लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे साजरा केला जाणार आहे. या कॉलेजची निवड रौप्य महोत्सवासाठी निश्चित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक योद्धा घडवणे आणि यातून सामाजिक सांस्कृतिक एक साखळी निर्माण करून विद्यार्थ्यांची उन्नती साधण्याच्या दृष्टीने उडाण महोत्सव महाविद्यालय स्तरावर घेण्यात येत आहे. या महोत्सवा मधून विद्यार्थ्यांनी आपली उन्नती साधून करिअर करावे असा हेतू आहे असे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग मुंबई विद्यापीठाचे समन्वयक डॉ कुणाल जाधव यांनी स्पष्ट केले. या उडान महोत्सव 2025 चा पथनाट्य स्पर्धेत प्रथम कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय तर वकृत्व स्पर्धेत प्रथम देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज, क्रिएटिव्ह रायटिंग प्रथम पंचम खेमराज महाविद्यालय लॉ कॉलेज, पोस्टर मेकिंग स्पर्धेत कुडाळ व्हिक्टर डॉटर्स लॉ कॉलेज हे प्रथम क्रमांकांचे विजेते ठरले. यंदाच्या उडान महोत्सवात देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ने आपले वर्चस्व कायम राखले. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ या चार तालुक्यातील जवळपास 17 महाविद्यालय व कॉलेजचे जवळपास 300 विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सवात सहभागी झाले होते.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे समन्वयक डॉ. कुणाल जाधव तसेच लोकमान्य ट्रस्टचे संचालक सचिन मांजरेकर, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, अँड. संतोष सावंत, मुंबई विद्यापीठाचे डॉ. सचिन राऊत, प्राचार्य यशोधन गवस, लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, क्षेत्रीय समन्वयक महेंद्र ठाकूर, उमेश परब, हळबे दोडामार्ग कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यावेळी उपस्थित होते. तसेच गव्हाणकर महाविद्यालयाचे प्राध्यापक आनंद नाईक ,शैलेश गावडे ,अस्मिता गवस, मेधा मयेकर, साईप्रसाद पंडित व सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.