
देवगड : देवगड फणसे येथील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये आशिष थोटम, अनिकेत थोटम, ओंकार थोटम, सुरेश थोटम, दिनेश थोटम, आयुष थोटम, सुशांत नवलू, सुदेश नवलू, महेंद्र राणे, रोहित थोटम तसेच फणसे गावातील इतर असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.या पक्ष प्रवेशावेळी भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, संदीप साटम, बंड्या नारकर, अमोल तेली, गणेश राणे, रवी पाळेकर, आणि उत्तम बिरजे उपस्थित होते.आ.नितेश राणे यांचा विकासकामांचा धडाका पाहून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याबद्दल यावेळी त्यांच्या कडून सांगण्यात आले.
उबाठाची सत्ता असलेलं हे गाव आ. नीतेश राणे यांनी या गावात सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या म्हणूनच, कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.