उभादांडा शाळा सभागृह छप्पर दुरुस्ती काम पावसाळ्यानंतर

पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन
Edited by: दिपेश परब
Published on: July 08, 2025 16:29 PM
views 107  views

वेंगुर्ला : उभादांडा शाळा नं.१ या शाळेच्या सभागृहाचे छप्पर काही दिवसांपूर्वी कोसळले. या सभागृहाच्या छप्पर दुरुस्तीबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी चर्चेद्वारे माहिती घेतली आणि या संदर्भात शाळेला निधी देण्याचे व पुढे पाऊस कमी झाला की लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासीत केले.

उभादांडा शाळा नं. १ च्या शाळा व्यवस्थापन समितीने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाळेविषयी चर्चा केली. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप तालुका अध्यक्ष पप्पू परब यांचे सहकार्य मिळाले. भेटीवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन नरसुले, अण्णा रेडकर, सुशांत वेंगुर्लेकर, लक्षाधीश केरकर, अजित वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. या सर्वांच्या प्रयत्नातून शाळेचे छप्पर दुरुस्तीचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.