तिरवडे तर्फ सौंदळतील उबाठाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 27, 2024 11:18 AM
views 419  views

वैभववाडी : आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये तेजस इंदुलकर, विकास घागरे, लक्ष्मण सुर्वे, सुभाष गावडे, पांडुरंग घागरे, गौरांग सुर्वे, आकाराम कांबळे, शरद घागरे, रघुनाथ घागरे, सिताराम मांडवकर, पांडुरंग शिंगरे, संजीवनी घागरे, सागर इंदूलकर व इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तिरवडे तर्फ सौंदळ येथे हा प्रवेश पार पडला. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.