उबाठा वेंगुर्ला संपर्कप्रमुखपदी हरिश्चंद्र चीपकर ; देवगड संपर्कप्रमुखपदी विजय परब

Edited by: विनायक गावस
Published on: July 01, 2023 12:13 PM
views 184  views

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वेंगुर्ले तालुका संपर्कप्रमुख पदी हरिश्चंद्र चिपकर यांची तर देवगड तालुका संपर्कप्रमुख पदी विजय परब यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांनी दिली.

ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या निर्देशानुसार ही निवड जाहीर केली.