
सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या तहसीलदारमध्ये फळपीक विमा संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. पक्षाचे आमदार महेश सावंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी शहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी, युवा सेना प्रमुख पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी केल आहे.