उबाठा शिवसेनेचा वीज अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 31, 2025 20:28 PM
views 26  views

कणकवली : कलमठ गावच्या वीज समस्येबाबत आपल्या विभागाकडे वारंवार आवाज उठविलेला आहे. कलमठ गावचे जवळजवळ शहरीकरण झाले आहे. कलमठमध्ये आता विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दिवसाआड लाईट ये-जा चालू असते. हे कित्येक वर्षे चालू आहे. कलमठ गावातील ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबद्दल १५ ऑगस्ट  रोजी सकाळी ७.०० वाजता कणकवली येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषणास करण्याचा इशारा ठाकरे शिवसेना कलमठच्या वतीने वीज वितरण कार्यकारी अभियंता कणकवली यांना  देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, कलमठ गाव हे खारेपाटण फिडरला जोडलेले असल्यामुळे या फिडरवरील कुठल्याही गावात प्रॉब्लेम झाल्यास कलमठ मधील विजेवर याचा सतत परिणाम होत असतो. त्यामुळे खारेपाटण फिडरचे दोन भाग करुन कलमठ फिडर वेगळा केल्यास दोन्ही फिडरला सोयीचे होईल. त्यामुळे या गोष्टीवर विचार करुन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.

यावळी उ.बा.ठा.पक्षाचे शिवसेना तालुका संघटक राजू राठोड ,उपतालुका प्रमुख जितेंद्र कांबळे, विलास गुडकर ,आशीष मेस्त्री,अविराज खांडेकर,सचिन पवार, आदित्य पालव आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.