
आंब्रड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कुडाळ तालुक्यातील आंब्रड जिल्हा परिषद विभागात संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
माजी आमदार वैभव नाईक यांनी आंब्रड, घोटगे, कुपवडे आणि सोनवडे येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. विभागप्रमुख राजू घाडी (आंब्रड), उपविभागप्रमुख आणा मेस्त्री (आंब्रड), उपविभाग संघटक मोहन घाडी-भरडकर, शाखाप्रमुख संतोष ठाकर (आंब्रड), युवासेना शाखाप्रमुख सिद्धेश घाडी (सोनवडे) यावेळी झालेल्या बैठकांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख महेश सावंत, उपविभागप्रमुख पी.डी. सावंत, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे, आंब्रड ग्रा. प. सदस्य सागर वाळके, माजी विभागप्रमुख दिनकर परब, घाटगे शाखाप्रमुख चंदन ढवळ, सोनवडे शाखाप्रमुख गुरु मेस्त्री यांच्यासह सुधीर भोसले, सुधीर नाईक, विरेश परब, जया परब, विजय परब, शेखर परब, रुपेश घाडी, बाबी टेमकर, जगदीश परब, अरविंद परब, दाजी परब, सोनू सावंत, शामा सावंत, अवी नाईक आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे आंब्रड विभागात शिवसेना पक्ष अधिक सक्रिय होईल, असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.