उबाठा शिवसेनाच्यावतीने केंद्र शाळा सोनावलला शिक्षण सेवक

Edited by: संदीप देसाई
Published on: July 12, 2023 16:42 PM
views 282  views

दोडामार्ग :  दोडामार्ग तालुक्यात  शून्य शिक्षकी शाळात स्वखर्चाने शिक्षण सेवक नियुक्ती दिली जात असून पटसंख्या जास्त असूनही शिक्षक कमी असलेल्या सोनावल शाळेत बुधवारी एका शिक्षण सेवकाची नियुक्ती केली आहे. याबाबतची माहिती ठाकरे शिवसेनेचे  युवा समन्वयक मदन राणे यांनी दिली आहे.

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या दोडामार्ग पदाधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षण सेवक नियुक्त करून विद्यार्थ्यांचे शैकषणिक नुकसान होऊ नये याची दक्षता घेतली आहे. दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम अशा सोनावल शाळेतही बुधवारी शिक्षक सेवक नेमण्यात आला आहे.

  श्रीम. सिया आनंद केसरकर यांची शिक्षक सेवक म्हणून नेमणूक करण्यात आली असून  तालुकाप्रमुख संजय गवस व उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या सहीचे  नेमणूक पत्र युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांच्या हस्ते व युवासेना पदाधिकारी संदेश वरक यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहे. यावेळी तेथील शिक्षिका सौ. गीतांजली सातार्डेकर व शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते.