उबाठा सेनेची रस्त्याच्या कामासाठी गगनबावडा ते तळेरे पदयात्रा

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 16, 2023 17:52 PM
views 271  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याच्याची दुरवस्था झाली आहे. गगनबावडा, करुळ, तळेरे या रस्त्याची पाहणी करत शिवसेनेच्या वतीने पदयात्रा ३० ऑक्टोंबर रोजी काढण्यात येणार आहे. ३० ऑक्टोंबरला रस्त्याची दुरवस्था झाल्याने लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे,महिला आघाडी प्रमुख नीलम पालव सावंत,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,युवा सेना उपतालुकाप्रमुख उत्तम लोके आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

या पदयात्रेत शिवसेना आ.वैभव नाईक,माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत,अतुल रावराणे, निलम पालव,सुशांत नाईक आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.या गगनबावडा, करुळ,तळेरे या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची  दुरवस्था आहे.

त्यावर लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम घेणार आहोत.यापूर्वी शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने वैभववाडी मध्ये रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते.प्रशासनातील अधिकारी यांना जाब विचारला होता.आतापर्यंत कुठलाही परिणाम या प्रशासनावर झाला नाही.खराब रस्त्यातून गणेश चतुर्थी झाली.पर्यटक,व्यापारी,रहिवाशी,वाहनचालक,रिक्षा चालक अन्य वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.पश्चिम महाराष्ट्राशी आपला व्यापारी संबंध आहे.जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

गगनबावडा, करुळ,तळेरे हा रस्ता २१ किलो मिटर लांबीचा आहे,१ डिसेंबर २०२२ रोजी निविदा झाली होती.मात्र कोणतेही काम सुरू झाले नाही.या रस्त्यासाठी २५० कोटी खर्च आहे,निविदा प्रक्रिया १८३ कोटी रुपयांची अपेक्षित होती.मात्र,४० टक्के बीलो ने हे काम भवानी कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे गेले आहे,११० कोटी रुपयांना निविदा उघडण्यात आली.या रस्त्यावर पावसाळी डांबर वापरून खड्डे बुजवण्यात यावेत,अशी मागणी होती.कुठलेही काम सुरु झालेले नाही.महामार्ग प्राधिकरण ने ३० ऑक्टोंबर पूर्वी काम सुरु करावे.या रस्त्यासाठी अडलेले जागा संपादन करावे,पुढील काळात दिवाळी येणार आहे.वैभववाडी,कणकवली तालुक्यातील लोकांना जास्त त्रास होत आहे.व्यापारी लोकांना त्रास होत आहे.


जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला.


अतुल रावराणे म्हणाले, गगनबावडा, करुळ,तळेरे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.सिमेंट काँक्रिट चा हा २१ किलो मिटर लांबीचा रस्ता आहे .गगनबावडा ते तळेरे त्या रस्त्याची ४० टक्के बिलो निविदा कशी ? या निविदेची चौकशी व्हावी.हे काम करताना कमिटी स्थापन होवून ते काम पाहिले जाईल, असा इशारा शिवसेना कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी दिला आहे.