देवगड : देवगड तालुक्यातील पुरळ हु्शी कोठारवाडी येथे उ.बा. ठा सेने च्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.या वेळी भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि खा.नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी आमदार प्रमोद जठार,माजी आमदार अजित गोगटे, पडेल मंडलाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, प्रभारी डॉ.अमोल तेली तसेच अनेक भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेश कर्त्यामध्ये भालचंद्र मुळम, लव मुळम, महेंद्र मुळम, दीपक मुळम, विलास मुळम, सुधाकर मुळम, प्रशांत मुळम, अनिल मुळम, साक्षी मुळम, रसिका मुळम, कविता मुळम, प्रगती मुळम, वृषाली मुळम, अस्मिता मुळम, प्रतिभा मुळम, वंदना मुळम, संतोष मुळम यांचा समावेश आहे. भाजपाच्याराष्ट्रीयविचारधारेबद्दल कार्यकत्यांचे स्वागत करताना भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी त्यांचे कौतुक केले. भापच्या विचार धारेने प्रेरित होऊन तसेच आ.नीतेश राणेंच्या कार्याचा झंझावात पाहून आपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचे प्रवेश कर्त्यांकडून या वेळी सांगण्यात आले.