शेतकऱ्यांच्या नावावर 'ते' बॅनर 'उबाठा'नं लावले

आग लावून पोळी भाजायची त्यांना सवयच : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 07:53 AM
views 89  views

सावंतवाडी : आफ्रिकेत प्रचार करून मतेही आयात करा हे बॅनर काजू शेतकऱ्यांनी नाही तर उबाठाच्या लोकांनी लावले आहेत. चांगल्या योजनांची बदनामी करण्याच काम 'उबाठा' करत असते. ते स्वतः काही आणू शकत नाही, शेतकऱ्यांना काही देऊही शकत नाहीत. केवळ आग लावायची आणि पोळी भाजून घ्यायची हे काम 'उबाठा'ची लोक करतात असा आरोप शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. मतदारसंघात लावलेल्या बॅंनरवरून मंत्री केसरकर यांनी उबाठा शिवसेनेला चांगलंच लक्ष केलं.‌

ते म्हणाले, काजू शेतकऱ्यांच्या संघटनांसोबत माझी बैठक झाली. त्यावेळी सगळे कारखानदार उपस्थित होते. १२० रू. काजुचा भाव निश्चित करून खरेदी सुद्धा केली. १२० हा भाव ग्रेडप्रमाणे आहे. अधिक दहा रूपये सरकार देणार आहे. हे शेतकऱ्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे. आचारसंहिता असल्यान पैसै जमा झाले नाहीत. आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील‌. त्यामुळे उबाठाचीच लोक बॅनर लावायची काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या संघटनेला देखील हे ठावूक आहे. शेतकऱ्यांच्या संघटनांसोबत बोलणी झाल्यावर अंमलबजावणी झाली आहे‌.  त्यामुळे बॅनर हा 'उबाठा'कडून लावला जात आहे. चांगल्या योजनांची बदनामी करण्याच काम उबाठा करत आहे. ते काही आणू शकत नाही, शेतकऱ्यांना काही देऊ शकत नाही. केवळ आग लावायची आणि पोळी भाजून घ्यायची हे काम उबाठाची लोक करतात असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी केला.