
वैभववाडी : 'त्या' आत्मदहनाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उबाठाचे नगरसेवक मनोज सावंत यांनी पोलीस स्थानकात स्वतः हजर राहण्याचा तो केला होता स्टंट // पोलीसांनी न बोलावता जाणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा // लोकांच्या मनातील गमावलेला विश्वास मिळवण्याचा एक केलेला केविलवाणा प्रयत्न // त्या आत्मदहन प्रकारावेळी न.प.ने केले होते चित्रीकरण // आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापुर्वी 'त्या' महीलेला आला होता फोन // 'त्या' फोनवरील संभाषण संपल्यावर महीलेने अंगावर ओतून घेतले होते डिझेल // 'तो' फोन कोणाचा होता? // ते संभाषण कोणाशी झाले? // हे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर सत्य येईल समोर // मनोज सावंत हे माध्यमांसमोर बोलताना घाबरले व भेदरलेले // त्यांची झाली होती त्रेधातिरपीट // नेमका कोणावर आरोप करायचा हेच सुचत नव्हते त्यांना // त्यांनी माझ्यावर केलेला आरोप हास्यास्पद // त्यांनी माझ्यावर केलेला आरोप सिद्ध केल्यास मी राजकीय संन्यास घेईन // 'तो' त्यांनी सिद्ध न केल्यास त्यांनी घ्यावा संन्यास // उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी दिलं आव्हान //