अवघ्या दोन तासात दुचाकी चोर जेरबंद ; न्यायालयीन कोठडी

Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 20:20 PM
views 97  views

सावंतवाडी : दुचाकी चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासात गाडीसह संशयिताला जेरबंद करण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले. विनोद मधुकर राऊळ (२८, रा. वेर्ले), असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. ही कारवाई सावंतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांनी केली. त्यांच्या या कामगिरीबाबत वरिष्ठांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तर आज त्याला येथील न्यायालयात जर करण्यात आले असता सुनावली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी शहरातील उभाबाजार शिवाजी चौक येथून १८ जूनला गजानन रघुनाथ वाडकर यांच्या मालकीची होडा कंपनीची एव्हिएटर दुचाकी चोरीस गेली होती. मात्र, मालक दुबईला असल्याने याबाबतची तक्रार देण्यात आली नव्हती. रविवारी याबाबत तक्रार दिल्यापासून केवळ दोन तासात पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यानी वेर्ले येथुन गाडीसह संशयित आरोपीला ताब्यात घेतले. गाडीचा व संशयिताचा त्वरित तपास लागल्याने गाडी मालक गजानन वाडकर यांनीही समाधान व्यक्त केले असून उपनिरीक्षक सुरज पाटील यांचेही आभार मानले आहेत. तर या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.