वागदेतील अपघातात कणकवलीतील दोन युवक ठार

Edited by: साहिल बागवे
Published on: August 24, 2024 06:12 AM
views 3832  views

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर वागदे येथील हॉटेल मालवणी जवळ मध्यरात्री २:३१ वा. उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून धडक बसल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर हॉटेल मालवणी जवळ कंटेनर महामार्गावर उभा असताना कणकवलीहून ओरोस च्या दिशेने जाणाऱ्या या ऍक्टीवा दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून बसल्याने या दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण ठार झाले. या अपघातात मृत झालेल्यांमध्ये कणकवली परबवाडी येथील संकेत नरेंद्र सावंत (वय २४) व कणकवली विद्यानगर येथील साहिल संतोष भगत (वय २३ ) यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, संतोष शिंदे, यांनी अपघातस्थळी धाव घेतली.